Lakadganj Fire | नागपुरात लकडगंज परिसरात लाकूड बाजारात भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
नागपूरच्या लकडगंज परिसरात लाकूड बाजारात आज पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत चार दुकानांचा मोठा नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र सुदैवाने आग पहाटेच्या सुमारास लागल्याने या आगीत कोणीही जखमी झालेला नाही. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस स्टेशन समोर असलेल्या आरा मशीनच्या ( लाकूड चिरण्याचा कारखाना ) परिसरात सकाळी सहाच्या सुमारास ही आग लागली. सर्व बाजूला लाकूड आणि प्लायवूड असल्याने आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाच्या 13 गाड्यानी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान तोपर्यंत चार आरा मशीन आणि दुकानांचा मोठा नुकसान झाला होतं. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग संपूर्ण बाजारात पसरू शकली नाही. त्यामुळे कोट्यवधींचा नुकसान मात्र टळला आहे.























