BJP MLAs Fake Call : मंत्रिपदाची बोगस ऑफर...JP Nadda यांच्या नावे अनेक आमदारांना फोन; प्रकरण काय?
भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी एबीपी माझाच्या या बातमीला दुजोरा दिला आहे.. फेब्रुवारी महिन्यात नाशिक मध्ये भाजपची बैठक सुरू असतानाच त्यांना राठोडचा फोन आला होता. जे.पी.नड़्डा तुमच्याशी बोलतील असं राठोड म्हणाला.. दुसऱ्या दिवशी त्यानं दुसऱ्या एका भामट्याकडे फोन देऊन, जे.पी.नड्डाच बोलातयत असं भासवण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपद हवं असेल तर पक्षातीलन गरीब उमेदवाराला मदत करावी लागेल, असं ही बोगस व्यक्ती म्हणाली. मात्र पक्षात पद देण्यासाठी पैसे मागितलं जाणं शक्य नाही, म्हणून सावरकर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. अन्य आमदारांशी संपर्क साधल्यावर त्यांनाही असे फोन आल्याचं समजलं.. चौकशीमध्ये सर्व गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा सावरकर यांनी व्यक्त केली आहे..























