Vasai : पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्निचा राडा
पहिल्या लग्नातून घटस्फोट घेण्याआधीच एका गृहस्थानं दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढण्याचा घाट घातला होता. पण पहिल्या पत्नीच्या धाडसामुळं त्याचं भांडं फुटलं. एखाद्या चित्रपटात शोभणारी ही घटना घडली आहे मुंबईजवळच्या वसईमध्ये. वसई पूर्वच्या जोशी पार्टी हॉलमध्ये होणाऱ्या लग्नात नवऱ्याची लबाडी उघडकीस आली. या प्रकरणात संबंधित व्यक्तीचं आणि गोंधळ घालणाऱ्या महिलेचं 2012मध्ये वैदिक पद्धतीनं लग्न झालं होतं. त्या लग्नात हुंडाही घेणाऱ्या गृहस्थानं अवघ्या सहा महिन्यात पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं.त्या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्याची सुनावणी होण्याआधीच आपला पती दुसरं लग्न करत असल्याची कुणकुण त्याच्या पहिल्या पत्नीला लागली. त्यानंतर तिनं थेट लग्नमंडपात येऊन पतीचा डाव उधळून लावला. अखेर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत वातावरण शांत केलं.























