Web Exclusive : 'संजय राऊत नेमका कुठल्या प्रतीचा गांजा घेतात', आमदार भातखळकरांचा आरोप
देशात 100 कोटी लसीचे डोस देऊन पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने आज देशभर सेलिब्रेशन होत आहे. मुंबईत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली मतदारसंघात आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून आणि कोविड योध्यांचा यांचा सन्मान करून सेलिब्रेशन करण्यात आलं. अतुल भातखळकर म्हणाले की, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. कठीण प्रसंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बाहेर काढलं आणि आज शंभर कोटी डोस पूर्ण होत आहेत. तिसरी लाट रोखण्यात लसीकरण याचा मोठा वाटा आहे
संजय राऊतांवर टीका करताना ते म्हणाले की, संजय राऊत नेमका कुठल्या प्रतीचा गांजा घेतात. पिंपरी चिंचवड मधील तथाकथित घोटाळा बाहेर काढण्याचा अधिकार नगर विकास खात्याकडे येतो. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली पाहिजे, महाराष्ट्रात एसीबी आहे त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे. पण संजय राऊत यांना सध्या काहीही कळत नाही. पण संजय राऊत यांना खात्री पटलेली आहे की त्यांचं सरकार घोटाळ्यांची चौकशी करू शकत नाही म्हणून ते किरीट सोमय्या आणि ईडीला पत्र लिहीत आहेत, असं ते म्हणाले.