Virar : विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चार कामगारांनी गमावला जीव
Virar : विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चार कामगारांनी गमावला जीव विरार पश्चिमेच्या गोलबलसिटी येथे रुस्तमजी शाळेलगत असलेल्या एस.टी.पी प्लांट मध्ये गी घटना घडली आहे. आज सकाळी 11:45 च्या सुमारास एक मंजूर प्लांटमध्ये पडला असता त्याला तीन जन वाचवण्यासाठी गेले त्यांचाही आत मध्ये पडून मृत्यू झाला आहे. शुभम पारकर 28, निखिल घाटाळ 24, सागर तेंडुलकर 29, अमोल घाटाळ 27 असे मयतांची नावे असून अर्नाळा सागरी पोलीस आणि वसई विरार महापालिकेचे अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पॉलीकॉन कंपनीचे हे चारही मजूर होते. ग्लोबल सिटी परीसरातील इमारतींचा हा एस.टी.पी प्लांट होता. अमोल घाटाळ या मजूराचा शोध अद्याप सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या























