Vasai Crime : वसईत पालिकेच्या वाहनांवर तुफान दगडफेक, चार कर्मचारी जखमी ABP Majha
वसईत चाळमाफियांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक करुन दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वसईच्या सातीवली वाघराल पाडा येथे सरकारी जमिनी आणि डोंगर गिळकृत करुन मोठया प्रमाणात चाळमाफियांनी अवैद्य बांधकाम सुरु केले आहे. वसई विरार शहर महापालिकेचं पथक आज दुपारी केळीचा पाडा, पाल नगरी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलं होतं. त्यावेळी चाळमाफियांनी पालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक केली. त्यांनी महापालिकेचा जेसीबी आणि पिकअप गाडीची तोडफोडही केली. या हाणामारीत पालिकेचे चार कर्मचारी दगड लागून जखमी झाले आहेत. याआधीही फेब्रुवारी २०१८ मध्ये कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक, तसंच पालिकेच्या गाडयांची तोडफोड करण्यात आली होती.























