Thane Diva स्थानकांमधील दोन मार्गिका सेवेत, Express साठी स्वतंत्र मार्गिका,लोकल प्रवास आणखी जलद
मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यानची पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरु करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून सलग ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर या मार्गावर दोन्ही दिशेने इंजिन चालवून चाचणी करण्यात आली. या चाचणीत नवीन बनवण्यात आलेला मार्ग सुरक्षित असल्याचे निदर्शनास आलं. त्यामुळं आज सकाळपासून सहाही मार्गिकांवर वाहतूक सुरु करण्यात आली. आता लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सुटणाऱ्या दोनशेपेक्षा अधिक एक्स्प्रेस आणि मेल पाचव्या-सहाव्या मार्गिकांचा वापर करतील. त्यामुळं उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगवेगळे होणार आहेत.























