एक्स्प्लोर
मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार! अवघ्या 30 लाखांत घर मिळणार; ठाकरे सरकारची खास योजना
मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं म्हणजे, सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्टचं... परंतु, आता तुमचं स्वप्न खरं होणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मुंबईकरांवा फक्त 30 लाखांमध्ये घरं खरेदी करता येणार आहेत. सध्या मुंबईतील घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरांत पोहोचल्या आहेत. अशातच ही गृहनिर्माण योजना म्हणजे, सर्वसामान्यांसाठी पर्वणीच असेल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















