(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Dasara Melava 2021 : आज शिवसेनेचा दसरा मेळावा; 1 हजार शिवसैनिक उपस्थित राहू शकणार
Shivsena Dasara Melava 2021 : आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षणमुखनंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी आता 1 हजार शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार?
दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.