Sharad Pawar : शरद पवारांची तोफ धडाडली, मोदी सरकार - शिंदे सरकारचा घेतला समाचार
ठाणे: भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून आतापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना भाजपने अच्छे दिन अशी घोषणा केली. हे अच्छे दिन कधीच नागरिकांना पाहायला मिळाले नाहीत असाही हल्लाबोल त्यांनी केला. ठाण्यातील बैठकीनंतर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत.
या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे. 2014 साली यांनी अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. पुन्हा 2019 साली यांनी न्यू इंडिया अशी घोषणा केली ती पूर्ण झालेली नाही. आता 2024 साला साठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी घोषणा देण्यात येतेय. त्याची पूर्तता होतेय का हे पाहणं महत्त्व आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















