Mumbai Traffic : मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम आणि प्रतिबंध लागू : ABP Majha
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू केले आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेली ट्रॅफिक अॅडव्हायझरी ही आज दुपारी २ वाजल्यापासून ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. जुहू बीचसह दक्षिण मुंबईतीलही अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. नागरिकांना या वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. शहीद भगतसिंह मर्गावर विस्तारीत आमदार निवासासमोर २ एमजी मार्गावर जहांगीर आर्ट गॅलरीसमोर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. महाकवी भूषण मार्ग, बेस्ट मार्ग, हेन्री रोड, बी . के . बोमन बेहराम मार्ग, हाजी नियाज आझमी मार्ग या पर्यायी मार्गावर उद्या पहाटे ६ पर्यंत बंद करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets