G-20 BMC : जी-20 साठी केलेल्या रोषणाईमुळे पालिकेच्या वीजबिलात 15 टक्क्यांनी वाढ : रईस शेख :ABP Majha
सध्या देशभर जी-२० चे वारे वाहतायत... आणि मुंबानगरी त्यासाठी झगमगतेय.. मात्र या झगमगाटाचा भुर्दंड मुंबई पालिकेवर पडतोय असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलाय.. जी-२० च्या निमित्तानं केलेल्या रोषणाईमुळे पालिकेच्या वीजबिलात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं रईस शेख यांचं म्हणणं आहे... या रोषणाईमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत असल्याचा त्यांचा दावा आहे... काही ठिकाणी हे लाईट्स तुटत असल्यानं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून तो पालिकेनं थांबवावा अश मागणी रईस शेख यांनी केलेय. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचं रईस शेख यांनी सांगितलंयच्या वीजबिलात 15 % वाढ
महत्त्वाच्या बातम्या























