Crime : कल्याण-डोंबिवलीत पाच सराईत चोरटे पोलिसांकडून जेरबंद, रिक्षा, बाईक आणि दागिने हस्तगत
कल्याण डोंबिवली चोरी ,जबरी चोरी, लूटीच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 कडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले आहे . या पथकाकडून आरोपींचा शोध मोहीम सुरु आहे. याच कारवाई दरम्यान मानपाडा पोलिसांच्या पथकाने पाच सराईत चोरट्याना अटक केली आहे .शुभम बोरडे, आकाश पोले,आकाश शर्मा, रफीक शेख,मोहीन अहमद अशी अटक आरोपींची नावे आहेत .त्यांच्याकडून जबरी चोरीचे 02 गुन्हे, घरफोडीचे 02 गुन्हे, वाहन चोरीचे 06 गुन्हे व फसवणुकीचा 01 असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत . चोरटय़ांक़डून तीन रिक्षा, तीन बाईक, मोबाईल, दागिने आणि काही रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.





















