PM Modi Vande Bharat Mumbai : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत (Mumbai) येणार असून त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी (Mumbai Police) काही मार्गात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीएसटीएम स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला मुंबई तसेच इतर भागातून बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.




















