(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ, कोणत्या शहरात किती दर?
Petrol-Diesel Price: देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.35 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोलच्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरु राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील यात शंका नाही.
देशातील चार प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर
- मुंबई : पेट्रोल 95.46 रूपये, डिझेल 86.35 रुपये
- बंगळूरू : पेट्रोल 91.97 रूपये, डिझेल 84.12 रुपये
- चेन्नई : पेट्रोल 91.22 रूपये, डिझेल 84.45 रुपये
- कोलकाता : पेट्रोल 90.27 रूपये, डिझेल 82.94 रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे. कच्च्या तेलाची किंमत 62 रूपये प्रति बॅरेल आहे.
मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे. मात्र सध्याच्या स्थितीत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होताना दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यव वस्तूच्या किमतीतही वाढ होताना दिसते.