एक्स्प्लोर
Tarapur Midc Blast | तारापूरमध्ये कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू | ABP Majha
तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात कंपनी मालक गंभीर जखमी असून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम झोन मधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ कामगार इमारती खाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक महिला तसंच एका मुलीचा समावेश असून जखमी असलेल्या कामगारांवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह पालघरचे पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















