Navi Mumbai तील सर्वात मोठ्या तुर्भे झोपडपट्टीत गेल्या 15 दिवसापासून कोरोनाचा एकही रूग्ण नाही
नवी मुंबईतील सर्वात मोठा झोपडपट्टी भाग म्हणून ओळख असलेल्या तुर्भे भागात गेल्या 15 दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न आढळल्याने पालिकेसाठी दिलासादायक बाब आहे. आज नवी मुंबई पालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी या भागाचा दौरा करीत आपल्या डॉक्टर, नर्स यांचे कौतूक करत परिस्थितीचा आढावा घेतला.
एमआयडीसी भागाला लागून असलेल्या तुर्भे झोपडपट्टी भागात 1 लाखापर्यंत लोकसंख्या आहे. या भागात 457 कोरोना रूग्ण सापडल्याने कम्युनिटी संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र मनपा प्रशासनाने याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत मिशन तुर्भे कोरोना मुक्तीची सुरुवात केली. घरोघरी जात प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग करण्यात आली. प्रत्येक गल्लीबोळात दिवसातून दोन तीन वेळा सॅनिटायझिंग करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालयाची एका एका तासाला स्वच्छता करण्यात आल्याने कोरोना संसर्गाची मोठी भिती टळली.