Mumbai Sakinaka Case: मुंबईत 'निर्भया'ची पुनरावृत्ती, पीडितेची प्रकृती गंभीर ABP Majha
मुंबई : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी मोहन चौहान (वय 45) याला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.























