Mumbai Water : मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट
Mumbai Water : मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीसंदर्भात तज्ज्ञांची समिती सोमवारी पुन्हा अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई शहरातल्या काही परिसरांमध्ये पाणीकपात करावी लागणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण विभागातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं, असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यामुळं मुंबई शहरातल्या कोणत्या परिसरातल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, ((























