Mumbai Thane Corona Precautions : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबई-ठाणे पालिका 'हे' करणार
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवल्यानंतर आता केंद्र सरकारने सावध पावलं उचलली आहे. मुंबईतदेखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेनं लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे. तसंच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची २ टक्के 'आरटीपीसीआर' चाचणी केली जाणार आहे. तर ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये या चाचण्यांचा आकडा दिवसाला दोन हजारपर्यंत नेण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान ठाणे पालिकेने कोणत्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून..