Mumbai Slums : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झोपडपट्टीवासियांना दिलासा देणारा निर्णय
राज्य शासनानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीवासियांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एक जानेवारी २००० ते एक जानेवारी २०११ या कालावधीतल्या झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांच्या मोबदल्यात पक्कं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एक जानेवारी २०२० ते एक जानेवारी २०११ या अकरा वर्षांच्या कालावधीत अस्तित्वात असलेल्या झोपड्यांमधून राहणाऱ्या नागरिकांचं सशुल्क पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात आवश्यक त्या अटीशर्ती मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाच्या पूर्वमान्यतेनं निश्चित कराव्यात, असं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे.