एक्स्प्लोर
Mumbai Rains: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, चाकरमान्यांना फटका
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे. पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास वाहन चालकांना एक ते दीड तासामध्ये करावा लागत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी कामासाठी निघाले आहेत, मात्र त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम रेल्वे देखील पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. खाजगी गाड्या घेऊन कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलीस ही कोंडी काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत.
मुंबई
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा























