Mumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहून
Mumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहून
पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील 24 तासांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
