(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Lok Sabha 2024 : कुठे ढिसाळ कारभार, कुठे आरोपांचा वार, राज्यातील मतदानाच्या हायलाईट्स
कुलाबा येथे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप आणि सेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. कुलाबा येथील म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रकार घडला.
राहुल नार्वेकर मतदान केंद्रावर आले असता ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. सध्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई- पार्ल्यामध्ये मतदान प्रचंड संथ गतीने होत आहे. शहाजीराजे मार्ग मनपा शाळेत रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण होऊन परत जात आहेत.
सिडको परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाची दिवशी अनेक घडामोडी घडत आहेत. आता माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत दिवे हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप दिवे यांनी केला. त्यामुळे वाद झाला होता. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. तर दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.