Mumbai: घरमालक पती- पत्नीकडून नोकराची हत्या, लोखंडी रॉडनं मारहाण ABP Majha
आपल्या 12 वर्षीय मुली ची झोपत छेड काढली या रागातून आई वडिलांनी 69 वर्षीय नोकराला बेदम मारहाण करीत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.अब्दुल खलील शेख असे मयत ६९ वर्षीय नोकराचे नाव आहे.अब्दुल हे आरोपी मोहम्मद सलीम जफर मोहम्मद अखतर आलम ऊर्फ सलीम आणि फरीदा यांच्या मुलुंड येथील घरी घरकाम करीत होते.1 तारखेला अब्दुल यांनी त्यांच्या मुलीला झोपतुन उठविताना अंगाला हात लावत छेड छाड केली असा आरोपी यांचे म्हणणे आहे.या रागातून दोन दिवस सलीम आणि त्याची पत्नी अब्दुल यांना लाकडी दांडे, पट्टे यांनी मारहाण करीत होते.त्यानंतर त्यांनी काल अर्धमेल्या अवस्थेत त्यांना शिवाजी नगर येथील त्यांच्या जावयाच्या हवाली करण्यास आणले.मात्र रस्त्यातच अब्दुल यांचा मृत्यू झाला.या नंतर या पतीपत्नीनी रस्त्यावर च अब्दुल यांचा मृतदेह फेकून पळ काढला.या मृतदेहाबाबत मानखुर्द पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठवला.या वेळी त्यांना मारहाण होऊन अंतर्गत हाडे तुटून रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले.पोलिसांनी या नंतर हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.




















