एक्स्प्लोर
Maratha Reservation Protest | CSMT वर आंदोलकांची गर्दी, वाहतूक कोंडी, शिदोरी घेऊन लोक दाखल
सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आंदोलकांसाठी शिदोरी घेऊन लोक मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी स्थानकावर मराठा बांधव अजूनही तळ ठोकून आहेत, गर्दी हुतात्मा चौकापर्यंत पसरली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दीडशे गाड्या मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. आंदोलनाचा हा तिसरा दिवस असून गर्दी वाढत आहे. आठवड्याचा पहिला सोमवार असूनही आंदोलक सीएसएमटी स्थानकाबाहेर तळ ठोकून आहेत. पोलिसांची कुमक कमी पडत असून बॅरिकेडिंग असूनही आंदोलक रस्त्यावर आहेत. आंदोलकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने शिदोरी घेऊन कार्यकर्ते जमा होत आहेत. यामुळे पोलिसांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी लावलेल्या बॅरिकेडिंगवर आंदोलकांनी बसून खेळ सुरू केले. सीएसएमटी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सीएसएमटी आणि पालिकेकडे येणारे सर्व वाहतूक मार्ग बंद ठेवले आहेत. जे जे उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानकाकडे वळवण्यात आली आहे. आंदोलक उद्यापासून पाणी घेणे बंद करणार असल्याने अनुयायांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























