Malad Building Collapse : मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Malad Building Collapse : मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुंबईत मुसळधार पावसामुळे एका दुमजली चाळीचा काही भाग कोसळला आहे. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.