Maharashtra Colleges Reopen :राज्यातील कॉलेजेस 'अनलॉक'; मंत्री Uday Samant पाहाणीसाठी थेट कॉलेजमध्ये
मुंबई, पुण्यातील अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच असले तरी राज्याच्या इतर भागातील कॉलेज कॅम्पस गजबजलेत. ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरीतील महाविद्यालयं उघडली आहेत. मागील दीड वर्षे घरुनच ऑनलाईन वर्गात हजेरी लावणाऱ्या विद्य़ार्थ्यांनी प्रत्यक्षात हजेरी कॉलेजमध्ये हजेरी लावली... त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा असाच होता. वर्गात बसून शिक्षणाचे धडे घेण्याचं वेगळंच समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. आजपासून कॉलेजच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारी म्हणत मैत्रीच्या आणाभाका घेतल्या जाणार आहेत. मात्र हे सगळं करताना विद्यार्थ्यांना कोरोना नियम आणि सरकारच्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. नियमावलीनुुसार विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये जाता येणार नाही. तसंच विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही खेळही टाळण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्यात.
आज कॉलेजेस सुरू झाल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.. त्यांच्याशी संवाद साधलाय. वैभव परब यांनी