Lalbaugcha Raja : भाविकांना ऑनलाइन दर्शन आणि प्रसादाची सुविधा; मंडळाचे सचिव सुधीर साळवी माझावर
मुंबई : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले आहे.
मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळा कडून तयारी केली जाणार आहे.






















