एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan 2021 : लालबागच्या राजाचं गिरगाव चौपटीवर मोठ्या उत्साहात विसर्जन ABP Majha
मुंबई : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. अनेकांनी कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य दिलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















