एक्स्प्लोर
लालबागचा राजा च्या दरबारात पुन्हा एकदा पोलिस-स्थानिक यांच्यात वाद, मार्ग बंद केल्याने बाचाबाची
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलिस आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहीला. गणेशोत्सवात गणेशभक्तं रात्रीच्या वेळी जागरणं करतात. या वर्षी कोविड १९ संसर्गामुळे कडक निर्बंधांसह मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांचे दोन डोस झालेले आहेत अशा मर्यादीत कार्यकर्त्यांना परवानगी राज्याच्या गृह विभागाने दिलीय. मात्र असं असतानाही पोलिसांनी रात्रीच्या जागरणाला परवानगी दिली नाही. त्यातच स्थानिक रहिवाश्यांच्या बिल्डिंग आणि चाळींमध्ये येण्याजाण्याच्या मार्ग पोलिसांना बँरिगेटींग केल्यामुळे बंद करण्यात आलेत. आज पहाटे कामावर जाणार्या रहिवाश्यांना त्यामुळे बाहेरही पडता आले नाही. कामासाठी बाहेर पडणार्या रहिवाश्यांची त्यामुळे पोलिसांसी बाचाबाची झाली. पोलिस जसे पोटापाण्यासाठी त्यांची नोकरी करतायेत तसेच स्थानिक रहिवाश्यांनाही नोकरी धंदा आहे. त्यांनी पुढील १० दिवस पोलिसांच्या बँरिगेटींगमुळे घरातच बंदिवासात रहायचं का..? असा प्रश्नं लालबागमधील स्थानिक रहिवाशी विचारत होते. अखेर रात्रभर चाललेल्या या वादावर सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांनी चर्चा करून बिल्डिंग आणि चाळींच्या प्रवेशद्वारावर लावलेेले बँरेगेटिंग हटवले. आणि स्थानिक रहिवाश्यांनी जाण्या येण्यास मार्ग करून दिला.
Tags :
Maharashtra Mumbai Police Ganesh Chaturthi Mumbai City Ganesh Festival Indian Festival Ganpati Ganesha Bollywood Stars Ganesh Utsav Siddhivinayak Darshan Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Lalbaugcha Raja 2021 Ganesh Chaturthi News Ganesh Chaturthi News Today Ganesh Chaturthi Updated News Ganesha Ganesha Ganesh Aarti Mumbai's Ganesh Chaturthi Ganesha God Festivals Of India Ganesh Temple Modaks Shree Siddhivinayak Ek Dantaya Jai Ganesh Jai Ganesh Deva Vighnaharta Police Barricadingमुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement