Janta Raja Show : शिवाजी पार्कवर सादर होणार जाणता राजा महानाट्य, आशिष शेलारांनी केलं आयोजन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रेरणादायी 'जाणता राजा' हे महानाट्य आजपासून शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर सादर केलं जाणार आहे... विशेष म्हणजे रसिकांना विनामुल्य हे महानाट्य पाहता येणार आहे... भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते या महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय.. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेलं 'जाणता राजा' हे महानाट्य आजपासून १९ मार्चपर्यंत सादर केलं जाणार आहेत... रोज सायंकाळी ६.४५ वाजता प्रयोग सादर केला जाणार आहे. या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह - बोरिवली , दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह- मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह- परेल या ठिकाणी उपलब्ध आहेत.























