कामात व्यस्त असल्यानं Raj Kundra काय करत होते याची कल्पना नव्हती, Shilpa Shetty चा जबाब समोर
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढताना दिसतायत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी व्यापारी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अश्लील फिल्म्स बनवणे आणि ते अॅपद्वारे प्रदर्शित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी राजविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे. शिल्पा शेट्टीचे संपूर्ण विवरण या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचून तिची विचारपूस केली आहे,या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात येईल. आता शिल्पा शिट्टीचा जबाब समोर आला आहे. कामात व्यस्त असल्यानं Raj Kundra काय करत होते याची कल्पना नव्हती असं शिल्पा शेट्टीने तिच्या जबाबात म्हटलं आहे.























