Sameer Wankhede यांना हायकोर्टाचा दिलासा, तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
Mumbai Drugs Case: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. जर गरज पडलीच तर वानखेडेंना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी किमान तीन दिवस आधी त्यांना नोटीस देणे बंधनकारक असेल. यामुळे त्यांना कोर्टात दाद मागण्याची संधी मिळेल, असे निर्देश देत समीर वानखेडे यांनी दाखल केलेली तातडीची याचिका गुरूवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने निकाली काढली. राज्य सरकार विशेष एसआयटी स्थापन करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली आपल्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे याची कुणकुण लागताच वानखेडेंनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने हायकोर्टात धाव घेतली होती.






















