Mumbai : Mantralaya बाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू : ABP Majha
मंत्रालयाबाहेर आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी सुभाष जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातला सावकार विलास साधू सिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने लोन घेतले होते,,, मात्र हे पैसे सावकार विलास शिंदे यांना ना दिलामुळे सुभाष जाधव यांच्या घराचा तोडफोड केले होते आणि कुटुंबासोबत मारहाण केले होते,,, यासंदर्भात शेतकरी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 ऑगस्ट ला मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र मंत्रालयाबाहेर सुरक्षारक्षकांनी आत मध्ये प्रवेश न दिला मुळे शेतकरी सुभाष जाधवनी अशा पद्धतीचे टोकाचं पाऊल उचलले आहे,,, सध्या मध्यरात्री मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश सुभाष जाधव याचा तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पुण्यात मंचर पोलिसांना ट्रान्सफर केले आहेत,,, यासंदर्भात अधिक चौकशी पुण्यातला मंचर पोलीस करणार आहेत