Coronavirus | कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने परिसरात पालिकेकडून कोळीवाड्याचं निर्जंतुकीकरण
मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांनी सील केला आहे. कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. तसंच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, रुग्णवाहिका परिसरात दाखल झालेल्या आहेत. वरळी हा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
कोरोना व्हायरस आता मुंबईतील मच्छिमारांच्या परिसरातही पसरला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच ते सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्व संशयिताचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्याचं कळतं. विशेष म्हणजे या संशयितांनी परदेशवारी केली नव्हती किंवा ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्याही संपर्कात आले नव्हते.






















