एक्स्प्लोर
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाचं अपहरण झाल्याचा कुटुंबाचा आरोप
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. मात्र त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचं 10 जणांनी अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. वरळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कोणत्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेतलं याबाबत अधिकृत माहिती सीबीआयने अद्याप दिलेली नाही. गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement