Anganwadi Sevika Protest Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन
Anganwadi Sewika Protest Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आता या संतप्त अंगणवाडी सेविका आझाद मैदानाबाहेरील महापालिका मार्गावर उतरल्या आहेत. त्यामुळे तिथं काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. अंगणवाडी सेविकांचं जवळपास एक महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. मात्र राज्य सरकारने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल झालेत.((सरकारने जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ठाकरे मातोश्रीवरुन आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.























