Andheri Gokhale Bridge : गोखले पुलाचा पहिला गर्डर टाकला, 15 फेब्रुवारीला एक मार्गिका खुली करणार
Andheri Gokhale Bridge : गोखले पुलाचा पहिला गर्डर टाकला, 15 फेब्रुवारीला एक मार्गिका खुली करणार
मध्य रेल्वे मार्गावरचा सायनचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात येणार असल्यानं पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक महत्त्वाचा रस्ता बंद होणार आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसणार असून, त्यांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. कारण अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. या पुलाची एक मार्गिका नव्या वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु करण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष्य आहे. वास्तविक या कामाला आधीच उशीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं गोखले पुलाच्या कामाचा घेतलेला आढावा.























