Ambernath: मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर गोंधळ,रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल
अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पुला जवळून जाणाऱ्या डिपी रस्त्यावर रात्री एका मद्यधुंद तरुणीचा गोंधळ पाहायला मिळाला. ही मद्यधुंद अवस्थेत असलेली तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून भरधाव वाहने अडवून वाहन चालकांना अश्लील शिवीगाळ करत होती. या तरुणीचा व्हिडिओ सध्या अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर प्रकार जवळपास एक तास सुरू होता. ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अनेक जणांनी बघ्याच्या भूमिका घेतली होती. काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन केला मात्र पोलीस येण्याआधीच सदर तरुणी मित्राच्या गाडीवर बसून निघून गेली. रात्रीच्या सुमारास या रस्त्यावर वारंवार असे प्रकार घडत असल्याने भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदरील ठिकाणी पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.






















