एक्स्प्लोर

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे.

Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डावाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटाला दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

नेमकं काय घडलं? (Why Rishabh Pant Retires Hurt News)

ऋषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर 15 चेंडूंमध्ये 3 धावा करून खेळत होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याने टाकलेल्या एका वेगवान आणि धोकादायक शॉर्ट बॉलवर पंतने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला न लागता ग्लोव्हला लागला. या चेंडूचा फटका पंतच्या मनगटाच्या हाडाला बसल्याचे दिसून आले. चेंडू लागताच पंत वेदनेने त्रस्त झाला. त्याने तातडीने हाताकडे पाहिले आणि फलंदाजी सुरू ठेवणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे स्पष्ट झाले.

फिजिओ लगेच मैदानात धावले अन्... (Why Rishabh Pant Retires Hurt Ind vs Sl 2nd Test)

यानंतर भारतीय संघाचा फिजिओ लगेच मैदानात धावून आला. पंतच्या मनगटावर बर्फ लावण्यात आला. त्याच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली. काही वेळ उपचार केल्यानंतर त्याच्या मनगटाला टेपही लावण्यात आली. मात्र, काही वेळाने ती टेप काढण्यात आली आणि पंचांनीही पंतची स्थिती तपासली. दुखापतीनंतर बराच वेळ मैदानावर उपचार सुरू होते. अखेर पंतला पुढे फलंदाजी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडले. त्याच्या जागी अष्टपैलू रविंद्र जडेजा फलंदाजीला आला.

पंतची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मनगटावर थेट चेंडू आदळल्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे भारतासाठी या कसोटी सामन्याचे महत्त्व मोठे असून, पंत हा संघातील प्रमुख फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. त्यामुळे तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामन्याद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. कोलंबोतील सिन्हालेज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळ सुरू असून, 61 षटकांनंतर भारताने 3 विकेट गमावत 218 धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल 81 धावांवर तर रविंद्र जडेजा 8 धावांवर नाबाद आहे.

हे ही वाचा -

Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
Suryakumar Yadav : हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget