पुढील दोन दिवसात Monsoon अरबी समुद्रात दाखल होणार, राज्यात पुढील ४ दिवस पावसाचे असणार : ABP Majha
सुरुवातीलाच मान्सूनची आंदवार्ता, दोनच दिवसांपूर्वी अंदमानात पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे... त्यामुले पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे... यावर्षी नियोजित वेळेपेक्षा तब्बल ६ दिवस आधी मान्सूनचे वारे सक्रीय झालेले आहेत... बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातल्या अनेक भागात सध्या पूर्वमोसमी पाऊस बरसतो आहे... हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४ दिवस पावसाचे असणार आहेत... यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.


















