#MarathaReservation पुन्हा एक मराठा, लाख मराठा! राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाची आंदोलनं
मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अशोक चव्हाण म्हणाले, की अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने आज सुप्रीम कोर्टाने अर्ज दाखल केलेला आहे. स्थगिती निरस्त (vacate) करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल. आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. उद्या किंवा परवा मुख्यमंत्री याबाबत भूमिका मांडतील.




















