एक्स्प्लोर
Yashomati Thakur on Bachchu Kadu Morcha :'सरकारने मुक्या-भैऱ्याचं सोंग बंद करावं', यशोमती ठाकूर यांचा इशारा
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकटे मुख्यमंत्री बनावं नाहीतर होम मिनिस्टर बनावं, सगळंच चुकतंय त्यांचं,' अशा शब्दात ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार आंधळं-बहिरं असून त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण आता ते शब्द फिरवत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असेही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांची दिवाळी काळी ठरली असून, हे सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना बोलावून तोंडाला चुना लावण्याचे काम करते, असा आरोपही ठाकूर यांनी केला. सरकारने मुक्या-बहिऱ्याचे सोंग बंद करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















