COVID 19 Vaccine : कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस घ्यावा लागणार का ? जाणून घ्या
कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोस, म्हणजेच तिसरा डोस घेणं गरजेचं आहे का? आणि तिसरा डोस घ्यायचा झाला तर कधी घेतला पाहिजे, किती दिवसाच्या अंतरानं घेतला पाहिजे, या सगळ्या संदर्भात लवकरच धोरण जाहीर केलं जाणार आहे.. केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी ही माहिती दिली आहे. दोन डोस घेतलेली काही मंडळी भीतीपोटी चोरीछुपे तिसरा डोस घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र हे टाळण्याचं आवाहन टास्क फोर्सनं केलं आहे. कारण अशा प्रकारे चोरीछुपे तिसरा डोस घेणाऱ्यांची सरकारी पातळीवर कुठलीच नोंद ठेवली जात नाही आहे. भारतात सध्या प्रत्येक महिन्याला ३० ते ३५ कोटी लशीचं उत्पादन सुरु आहे. त्यामुळं लशीच्या तुटवड्याची भीती न बाळगता तिसऱ्या डोसची घाई करु नका असं आवाहन कोविड टास्क फोर्सनं केलं आहे..






















