Web Exclusive | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोल्हापूरचं राजघराणं आक्रमक;समरजितराजे घाटगे उपोषण करणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता कोल्हापूरचं राजघराणं आक्रमक झालं आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातील वंशज समरजितराजे घाटगे 24 फेब्रुवारीला शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली बसून उपोषण करणार आहेत. राजघराण्यातील एखादी व्यक्ती पहिल्यांदाच अशा प्रकारे उपोषण करून आंदोलन करणार आहेत. करवीर निवसानी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन समरजितसिंह घाटगे सपत्नीक लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. वीज बिलं, कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 24 तारखेला भर उन्हात दिवसभर शाहू पुतळ्यासमोर बसून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असून याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले आहे.





















