एक्स्प्लोर
War of Words: 'माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही', Ashok Chavan यांचा Chikhlikar यांना टोला
नांदेडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही', असा थेट टोला अशोक चव्हाण यांनी हदगावमधील सभेत लगावला. माझ्यावर टीका करून काहीजण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही चव्हाण म्हणाले. चव्हाणांच्या या टीकेला उत्तर देताना चिखलीकर यांनी जिल्ह्याच्या विकासावर भर दिला. वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्याऐवजी नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये कसा येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत चिखलीकर यांनी व्यक्त केले. वडिलांच्या पुण्याईमुळे मिळालेली संधी आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न, याला मी महत्त्व देत नाही, असे म्हणत चव्हाणांनी चिखलीकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
नाशिक
ऑटो
Advertisement
Advertisement

















