एक्स्प्लोर
Voter Fraud Claim | Rahul Gandhi यांचा दावा खोटा, ABP Majha च्या पडताळणीत सत्य समोर
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत आदित्य श्रीवास्तव नावाच्या मतदारानं चार ठिकाणी मतदान केल्याचा दावा केला होता. त्यातील एक पत्ता मुंबईतला होता. एबीपी माधवनं त्या पत्त्याचा शोध घेतला आणि यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एबीपी माधवनं केलेल्या पडताळणीत राहुल गांधी यांचा तो दावा खोटा असल्याचं दिसून आलं. आदित्य श्रीवास्तव यांचा जोगेश्वरी पूर्वचा दिलेला पत्ता खोटा आहे, पण त्याच परिसरात ब्लू मे डोझ इमारतीत दोन हजार एकवीस पर्यंत आदित्य श्रीवास्तव नावाची व्यक्ती खरोखरच राहत होती हे समोर आलं. आदित्य श्रीवास्तव मूळचे लखनऊचे आहेत. दोन हजार सोळा साली ते नोकरीनिमित्त मुंबईत आले. दोन हजार एकवीस पर्यंत मुंबईत राहिल्यावर ते बंगळूरूत शिफ्ट झाले. आदित्य यांनी लखनऊमध्ये पहिल्यांदा वोटर कार्ड तयार केलं होतं. मुंबईत आल्यावर त्यांनी इथंही वोटर कार्ड अपडेट केलं. आदित्य यांनी मुंबईत केवळ दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला मतदान केलं आणि त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये ते बंगळूरूत शिफ्ट झाले. तिथं गेल्यावर त्यांनी पुन्हा वोटर कार्ड अपडेट केलं आणि कर्नाटक निवडणुकीत मतदान केलं. नव्या जागी राहायला गेल्यावर जुना रेकॉर्ड पुसला जातो असा आदित्य श्रीवास्तव यांचा समज होता, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही.
महाराष्ट्र
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण




















