Vitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP Majha
Vitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP Majha
हे देखील वाचा
IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवाल
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : "लंडनहून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही. खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत", असा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला होता. दरम्यान सावंत यांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. ट्वीटरवर व्हि़डीओ पोस्ट करत भाजपला भावनिक राजकारण करण्याची सवय आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड ट्वीटरवर लिहितात, अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती', अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, " म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही." म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका !