Vijay Wadettiwar Nagpur: लोकसभा मतदारसंघासाठी वडेट्टीवारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
Vijay Wadettiwar Nagpur: लोकसभा मतदारसंघासाठी वडेट्टीवारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस तयारीला लागली आहे... राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निरीक्षकांची नियुक्ती केलीये... नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची निरीक्षक म्हणून पक्षाने नियुक्ती केलीये..वडेट्टीवारांनी आज नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक आयोजित केली आहे. मतदारसंघातील स्थिती, यासोबतच पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी शमवणं ही आव्हानं वडेट्टीवार यांच्यासमोर असणार आहेत.पहिल्या सत्रात नागपूर लोकसभेची तर दुसऱ्या सत्रात रामटेक लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडणार आहे.




















